Weather Update : राज्यात विविध ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून, येत्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या ओडिशाच्या किनारपट्टीजवळ सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि महाराष्ट्रावर तयार झालेल्या इतर वातावरणीय प्रणालींमुळे राज्यात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात खेचले जात आहेत, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Weather Update
राज्यावर दुहेरी वातावरणीय प्रणालींचा प्रभाव
सध्याच्या हवामान स्थितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र (Low-Pressure Area) सक्रिय झाले आहे. यासोबतच मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि मध्यप्रदेशमार्गे या प्रणालीपर्यंत विस्तारला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात विदर्भावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र (Cyclonic Circulation) आणि मराठवाड्यावर उंच वातावरणीय पातळीवर हवेचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. या सर्व प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात आर्द्रता वाढली असून, पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.Weather Update
सध्याची स्थिती आणि येणाऱ्या पावसाचा अंदाज
गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. आज सकाळच्या सॅटेलाईट प्रतिमेनुसार, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. याशिवाय, पुणे घाट परिसरातील भीमाशंकर आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्येही पावसाळी ढग दाटलेले दिसत आहेत.
येत्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भातील यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर अधिक राहील. हा पाऊस सर्वत्र सारखा नसेल, काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहू शकते.Weather Update
उत्तर महाराष्ट्र, खान्देश आणि कोकण
नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये, तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगरच्या पश्चिम घाट परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या पठारी भागात पावसाचा जोर कमी राहणार
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पठारी भागांमध्ये (मधला भाग) विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही. या भागांत स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या सरी किंवा गडगडाट होऊ शकतो, अन्यथा बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमीच राहील.
हे पण वाचा:

या सर्व अंदाजानुसार, नागरिकांनी पुढील २४ तास सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः शेतीच्या कामांमध्ये योग्य नियोजन करावे आणि पाऊस व विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.Weather Update

