TVS Raider : भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने आपली लोकप्रिय कम्युटर बाईक ‘Raider’ चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. मार्वलच्या प्रसिद्ध सुपरहिरोंच्या थीमवर आधारित ‘डेडपूल’ आणि ‘वुल्व्हरिन’ एडिशन बाजारात आणले आहेत. तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे खास मॉडेल्स डिझाइन केले आहेत, ज्यांची किंमत ९९,४६५ रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून हे दोन्ही मॉडेल्स देशभरातील सर्व डीलरशिपवर उपलब्ध होणार आहेत.TVS Raider
‘डेडपूल’ आणि ‘वुल्व्हरिन’ची प्रेरणा
हे नवीन मॉडेल्स मार्वलच्या ‘एक्स-मेन’ सुपरहिरो डेडपूल आणि वुल्व्हरिनपासून प्रेरित आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘डेडपूल अँड वुल्व्हरिन’ चित्रपटातील ही दोन्ही पात्रे खूप लोकप्रिय आहेत. याआधी, TVS ने त्यांच्या NTorq स्कूटरसाठी ‘कॅप्टन अमेरिका’ एडिशन देखील लॉन्च केले होते.TVS Raider
नवीन मॉडेल्सची खास वैशिष्ट्ये
नवीन ‘रेडर’ स्पेशल एडिशनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये आयजीओ असिस्ट (IGO Assist) आणि बूस्ट मोड (Boost Mode) आहे, ज्यामुळे बाईकचा पिकअप जलद होतो. तसेच, ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (GTT) मुळे कमी वेगातही बाईक सहज चालते आणि चांगले मायलेज देते.
इतर महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, आयएसजी सायलेंट स्टार्ट सिस्टम (ISG Silent Start System), साइड स्टँड इंडिकेटर, आणि इंजिन कट-ऑफचा समावेश आहे. याशिवाय, बाईकमध्ये पूर्णपणे कनेक्टेड रिव्हर्स एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. या डिस्प्लेवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, मेसेज नोटिफिकेशन, लो फ्युएल इंडिकेशन आणि व्हॉइस असिस्टसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
पॉवर आणि मायलेज
या बाईकमध्ये १२४.८ सीसी चे इंजिन आहे. ही बाईक फक्त ५.८ सेकंदांमध्ये ० ते ६० किमी/ताशी वेग गाठू शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक सुमारे ५५ किमी प्रति लीटर मायलेज देते. यामध्ये इको, पॉवर आणि बूस्ट असे ३ रायडिंग मोड देखील आहेत.TVS Raider