Soybean Crop Protection :जोरदार पावसानंतर सोयाबीन पिकाला धोका; कीड-रोग नियंत्रणासाठी ‘हे’ उपाय करा…

Soybean Crop Protection : राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर आता कमी होत असला तरी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. पाऊस थांबल्यानंतर आणि शेतातील पाणी ओसरल्यावर सोयाबीन पिकावर विविध प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या परिस्थितीत, शेतकऱ्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पिकाचे नुकसान टाळता येईल.Soybean Crop Protection

सोयाबीन पिकावरील प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन

सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहते, ज्यामुळे मुळांना आवश्यक अन्नद्रव्ये मिळत नाहीत. पाणी ओसरल्यावर, जमिनीतील वाढलेला ओलावा, ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रता अळीवर्गीय किडींच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. यात प्रामुख्याने पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) आणि शेंगा पोखरणारी अळी (हेलिकव्हर्पा अर्मिजेरा) यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे.Soybean Crop Protection

1. पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)

ही अळी सोयाबीनच्या पानांवर लहान गोल छिद्रे पाडते आणि नंतर संपूर्ण पाने खाऊन टाकते. गंभीर प्रादुर्भाव झाल्यास झाडांवर जाळ्यासारखे धागे तयार होतात, पाने गळून पडतात आणि झाडाची वाढ खुंटते. ही अळी नंतर फुले आणि शेंगांवरही हल्ला करते.

नियंत्रण:

  • कामगंध सापळे: अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे शेतात लावावेत.
  • जैविक नियंत्रण: एस. एल. एन. पी. व्ही. 500 एलई विषाणू 2 मिली किंवा नोमोरिया रिलाई या बुरशीजन्य कीडनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही बुरशी अळ्यांना रोगग्रस्त करून नष्ट करते.
  • रासायनिक नियंत्रण: प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली, किंवा फ्लुबेंडामाइड 39.35% एससी 3 मिली, किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 3 मिली, किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्डा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी 2.5 मिली, किंवा टेट्रानिलिप्रोल 18.18 एससी 5 मिली, किंवा अॅसिटामिप्राइड 25% + बायफेंथ्रीन 25% डब्लू जी 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.Soybean Crop Protection

2. शेंगा पोखरणारी अळी (हेलिकव्हर्पा अर्मिजेरा)

ही अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते, ज्यामुळे शेंगांवर लहान गोल छिद्रे दिसतात. एका अळीमुळे अनेक शेंगांचे नुकसान होते, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येते.

नियंत्रण:

  • जैविक आणि यांत्रिक उपाय: पक्षी थांबे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा. नोमोरिया रिलाई या बुरशीजन्य कीडनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. थंड आणि ढगाळ वातावरणात हे कीडनाशक अधिक प्रभावी ठरते.
  • रासायनिक नियंत्रण: क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा एंडोक्साकार्ब 15.8% 7 मिली किंवा क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल 9.3% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.60% 4 मिली हे संयुक्त कीडनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

3. खोडमाशी

खोडमाशी खोडात शिरून आतील गर खाते, ज्यामुळे खोड पोखरले जाते. यामुळे पिकाची वाढ खुंटते, पिके वाकतात किंवा वाळतात आणि शेंगांचे प्रमाण व दर्जा कमी होतो.

नियंत्रण:

  • खोडमाशीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रॅनिलीफ्रोल 18.5% एस.सी. 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

4. शंखी गोगलगाय

या काळात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक 2 किलो प्रति एकर क्षेत्रात संध्याकाळच्या वेळी शेतात आणि बांधाच्या कडेला पसरवून द्यावे.Soybean Crop Protection

सोयाबीन पिकावरील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन

1. तांबेरा

हा एक बुरशीजन्य रोग आहे. जास्त पाऊस, आर्द्रता, थंड हवामान आणि 6 तासांपेक्षा जास्त वेळ पाने ओली राहणे या रोगासाठी अनुकूल आहे. यामुळे पानांच्या खालील बाजूस तपकिरी रंगाचे पुरळ येतात, जे नंतर पसरतात. पाने पिवळी पडून अकाली गळतात, ज्यामुळे दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादनात घट येते.Soybean Crop Protection

नियंत्रण:

  • लक्षणे दिसताच हेक्साकोनॅझोल 5% ईसी 10 मिली किंवा प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली किंवा क्रिसोक्सिम मिथाईल 44.3% एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्यात.

2. बुंधा सड (कॉलर रॉट)

हा बुरशीजन्य रोग दीर्घकाळ पाणी साठून राहिल्यामुळे होतो. झाडाच्या मातीजवळील खोडाचा भाग सडतो आणि त्यावर पांढरी बुरशी वाढते. यामुळे झाड सुकून जाते आणि लहान रोपे लगेच मरतात.

नियंत्रण:

  • रोगट झाडे वेळीच उपटून नष्ट करावीत.
  • शेतात पाण्याचा चांगला निचरा होईल याची काळजी घ्यावी.
  • याच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून दोनदा फवारणी करावी.

3. पानांवरील ठिपके

हा रोग जास्त आर्द्रता आणि ढगाळ हवामानामुळे वाढतो. पानांवर तपकिरी, काळसर किंवा तांबूस रंगाचे ठिपके दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पाने पिवळी होऊन गळतात, ज्यामुळे उत्पादनात घट येते.Soybean Crop Protection

नियंत्रण:

  • गरजेनुसार पायराक्लोस्ट्रोबीन 20% डब्लू जी 10 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% डब्लू जी 25 ग्रॅम किंवा पायराक्लोस्ट्रोबीन 13.3% + एपोक्सीकोनॅझोल 5% एस ई 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

4. पानावरील व शेंगेवरील करपा

अधिक तापमान, जास्त आर्द्रता आणि ढगाळ हवामान या रोगासाठी पोषक असते. यामुळे पिकाच्या फुलोऱ्यात असताना पानांवर तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. नंतर शेंगा पिवळ्या पडून दाणे हलके आणि सुरकुतलेले होतात.

नियंत्रण:

  • या रोगाच्या नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% डब्लु जी 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% ईसी 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

इतर महत्त्वाच्या सूचना:

  • जैविक उपाय: बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक बुरशीची 4 किलो प्रति एकर आळवणी करावी.
  • आलटून पालटून फवारणी: एकाच कीडनाशकाची किंवा बुरशीनाशकाची वारंवार फवारणी करू नये. त्याऐवजी आलटून-पालटून वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरावीत.
  • नियमित निरीक्षण: पाऊस थांबल्यानंतर शेताचे नियमित निरीक्षण करणे आणि लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.Soybean Crop Protection

Leave a Comment