जिओचा ग्राहकांना झटका: 28 दिवसांचा 1 GB डेटा प्लॅन बंद, आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार… Jio Plan

Jio Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त 1 GB डेटा असलेला प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. या निर्णयामुळे आता जिओ वापरकर्त्यांना 28 दिवसांचे रिचार्ज करण्यासाठी किमान 299 रुपये खर्च करावे लागतील.

अनेक वर्षांपासून जिओने आपल्या कमी दरातील प्लॅन्समुळे लाखो ग्राहक जोडले आहेत. सुरुवातीला शंभर-सव्वाशे रुपयांत 4G इंटरनेट देणारी कंपनी आता हळूहळू आपले प्लॅन्स महाग करत आहे. काही वर्षांपूर्वी 199 आणि 249 रुपयांना मिळणारे प्लॅन्स आता बंद झाले आहेत.

यापूर्वी 209 रुपयांमध्ये 22 दिवसांची वैधता आणि 249 रुपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेले 1 GB डेटा प्लॅन्स उपलब्ध होते. पण आता हे दोन्ही प्लॅन्स कंपनीने बंद केले आहेत. त्यामुळे 28 दिवसांसाठी डेटा आणि कॉलिंगची गरज असलेल्या ग्राहकांना 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे.Jio Plan

उद्योग विश्लेषकांच्या मते, जिओने प्रत्येक वापरकर्त्याकडून मिळणारे सरासरी महसूल (Average Revenue Per User – ARPU) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या जिओचा ARPU 209 रुपये आहे. याआधी व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांनीही त्यांचे स्वस्त प्लॅन्स बंद केले होते.Jio Plan

ग्राहकांसाठी पर्याय काय?

जर तुम्हाला 299 रुपये खर्च करायचे नसतील, तर जिओने (Jio Plan) काही इतर पर्याय उपलब्ध ठेवले आहेत.

  • 239 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल.
  • 189 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात एकूण 2 GB डेटा (मासिक), अमर्यादित कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.
  • 198 रुपयांचा प्लॅन: जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर 198 रुपयांचा प्लॅन चांगला आहे. यात 14 दिवसांची वैधता आणि दररोज 2 GB डेटासह अमर्यादित कॉलिंग मिळते.

जिओच्या (Jio Plan) या नवीन धोरणामुळे कमी बजेट असलेल्या ग्राहकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.Jio Plan

Leave a Comment