लाडकी बहीण ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? अदिती तटकरे याची माहिती! ladaki bahin aditi tatkare.

ladaki bahin aditi tatkare महाराष्ट्रातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ ही खरंच एक मोठी मदत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून आला नसल्यामुळे अनेक महिला चिंतेत होत्या. सप्टेंबर महिना सुरू होऊनही पैसे जमा न झाल्याने काही महिलांच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होतील अशा चर्चांनाही ऊत आला होता. मात्र, मंत्री आदिती तटकरे यांनी ‘साम टीव्ही’शी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. “लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल,” असे त्यांनी सांगितले. तसेच, ‘महायुती’ सरकार ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

योजनेतील आव्हाने आणि पुढील कार्यवाही

ही योजना गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यावर सरकार भर देत आहे. नुकतेच, नागपूरमध्ये ११२९ नोकरदार महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. अशा अपात्र महिलांवर लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, एकाच जिल्ह्यात तब्बल ५२,००० महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे नाकारले गेले आहेत. त्यामुळे अशा महिलांना ऑगस्ट आणि पुढील हप्ते मिळणार नाहीत. अर्ज करताना तुमची माहिती अचूक असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, मंत्री आदिती तटकरे यांच्या घोषणेमुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे. अद्याप पर्यंत तारीख जारी निश्चित झाली नसली तरी या अदिती तटकरे याच्या माध्यमातून दिलेल्या माहितीच्या आधारे सरकार लवकरच हा हप्ता वाटप करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार? ladaki bahin aditi tatkare

जरी हप्ता वाटप करण्याची तारीख जाहीर झाली नसली तरी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या घोषणेनुसार, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल.

ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा होतील का?

सध्या तरी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र, ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मागील 4 ते 5 महिन्या पासून मागील महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यात वितरित केला जात आहे. त्या नुसार सप्टेंबर महिन्यात फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

Leave a Comment