नमो शेतकरी महासन्मान निधी: तारीख फिक्स !! namo shetkari hapta date

namo shetkari hapta date महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून हा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले होते. सुरुवातीला काही ठिकाणी 17 सप्टेंबर 2025 ही तारीख समोर येत होती, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडा नाराजीचा सूर होता. मात्र, आता हा हप्ता तातडीने वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

9 सप्टेंबरपासून हप्त्याचं वितरण सुरू namo shetkari hapta date

कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर 2025 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे.

हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. सूत्रांनुसार, 10 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

92 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार लाभ

या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 92 लाख 30 हजार पेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत. सरकारने यापूर्वीच हप्त्याच्या वितरणासाठी 1932 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, ज्यामुळे ही योजना बंद झाली नसल्याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला होता.

या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची स्थिती (FTO Generation Status) तपासण्याबद्दलची अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल. ती माहिती समोर आल्यानंतर, तुम्ही तुमचा अर्ज कसा तपासावा याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल.

एकंदरीत, नमो शेतकरी योजनेच्या या नवीन हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

Leave a Comment