सरकार कडून महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी. goverment employee news

goverment employee news यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारी, अधिकारी, निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोणालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने सरकारनं ऑगस्ट महिन्याचा पगार आणि निवृत्ती वेतन पाच दिवस आधीच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवापूर्वीच हातात येणार पगार goverment employee news

साधारणपणे दर महिन्याचा पगार १ तारखेला मिळतो, पण या वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, १ सप्टेंबर २०२५ रोजी देय असणारा ऑगस्ट २०२५ महिन्याचा पगार, निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन २६ ऑगस्ट २०२५ रोजीच दिले जाणार आहे. हा निर्णय केवळ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर जिल्हा परिषद, अनुदानित शिक्षण संस्था, कृषी आणि अकृषी विद्यापीठांतील कर्मचारी, तसेच त्यांचे निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठीही गुड न्यूज

goverment employee news या निर्णयामुळे फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देखील २६ ऑगस्टलाच मिळणार असल्यामुळे, तेही गणेशोत्सव उत्साहात साजरा करू शकतील.

सरकारच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी आणि इतर खर्चांसाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेवर पैसे येतील. त्यामुळे, कोणताही ताण न घेता सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करू शकतील.

Leave a Comment