thane mahanagarpalika bharti 2025 नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने विविध संवर्गातील तब्बल १७७३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६५ विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे. यामध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ स्तरावरील पदांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, काही पदांसाठी पात्रता १२ वी उत्तीर्ण, तर काहींसाठी पदवी किंवा विशिष्ट तांत्रिक शिक्षण (उदा. ITI, पॉलिटेक्निक, बी.ई.) आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये सहायक परवाना निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, नाई, स्वयंपाकी, वैद्यकीय सेवांशी संबंधित पदे, अग्निशमन सेवा आणि तांत्रिक सेवा अशा विविध पदांचा उल्लेख आहे.
TCS घेणार परीक्षा, अभ्यासक्रमावर लक्ष देणे महत्त्वाचे
ही संपूर्ण भरती प्रक्रिया टीसीएस (TCS) या कंपनीमार्फत राबवली जाणार असल्याने परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम टीसीएस पॅटर्ननुसार असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी तयारी करताना खालील विषयांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे:
- बौद्धिक चाचणी (Reasoning): टीसीएसच्या परीक्षांमध्ये या घटकावर सर्वाधिक भर दिला जातो.
- इंग्रजी
- मराठी
- सामान्य ज्ञान (General Knowledge)
- गणित: या विषयावर तुलनेने कमी प्रश्न (अंदाजे ५ प्रश्न) विचारले जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या तारखा आणि तपशील thane mahanagarpalika bharti 2025
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १२ ऑगस्ट २०२५ (दुपारी २ वाजल्यापासून)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २ सप्टेंबर २०२५ (रात्री १२ वाजेपर्यंत)
- ऑनलाइन प्रवेशपत्र: परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उपलब्ध होईल.
- परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹ १०००
- मागास प्रवर्ग: ₹ ९००
- अधिकृत संकेतस्थळ: www.thanecity.gov.in
या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने जाहीर केलेली ही भरती राज्यातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेपैकी एक मानली जात आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.