Onion Subsidy: कांदा अनुदानाचे विघ्न दूर! या शेतकऱ्यांना मिळणार 52 लाख रुपयांचे अनुदान अखेर प्रतीक्षा संपली

Onion Subsidy : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले कांदा अनुदान अखेर कोपरगाव तालुक्यातील 210 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते, परंतु आता त्यांना 52 लाख 71 हजार 644 रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.Onion Subsidy

नेमके प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते. 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समिती, किंवा नाफेडला लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना होती.

मात्र, अनेक शेतकरी पात्र असूनही, कागदपत्रांची अपूर्णता आणि तांत्रिक कारणांमुळे त्यांना हे अनुदान मिळाले नव्हते. कोपरगाव तालुक्यातील शेतकरीही या समस्येमुळे त्रस्त होते.Onion Subsidy

पाठपुराव्याला यश

स्थानिक आमदार आशुतोष काळे यांनी या शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन सादर केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने या प्रकरणाकडे लक्ष दिले आणि कोपरगाव तालुक्यातील 210 शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल. या अनुदानामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.Onion Subsidy

Leave a Comment