Namo Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. केंद्र सरकारचा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित करण्यात आला, मात्र राज्य सरकारच्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.Namo Installment
पीएम-किसानचा २० वा हप्ता वितरित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑगस्ट २०२५ रोजी पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील ९.७० कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर २०,५०० कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित (DBT) करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यात एकूण १ हजार ९३० कोटी रुपये जमा झाले आहेत.
‘नमो शेतकरी’च्या सातव्या हप्त्याचे काय?
केंद्र सरकारचा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्यातील शेतकरी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार, अशी विचारणा करत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.Namo Installment
शासकीय प्रक्रिया काय सांगते?
कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नमो शेतकरी’ योजनेचा हप्ता देण्याबाबतची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्यांची माहिती (डेटा) केंद्र सरकारकडून राज्य सरकारने मिळवली आहे. राज्य सरकारच्या स्तरावरून निधी मंजूर झाल्यानंतर आणि त्याचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध झाल्यानंतरच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल. सातवा हप्ता एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी अपेक्षित असला तरी, अद्याप निधी वितरणाचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही, त्यामुळे निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सहावा हप्ता राज्यातील ९३ लाख ९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. त्यामुळे आता सातव्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन रक्कम कधी जमा होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.Namo Installment