Gas Cylinder Subsidy :महिलांसाठी आनंदाची बातमी: आता या महिलांना गॅस सिलेंडर 300 रुपये ला मिळणार

Gas Cylinder Subsidy : केंद्र सरकारने देशभरातील महिलांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या पात्र लाभार्थ्यांना आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर थेट ₹३०० ची सबसिडी (Gas Cylinder Subsidy) (अनुदान) मिळणार आहे. या निर्णयामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १२,००० कोटी रुपयांच्या या अनुदानाच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. या निर्णयामुळे देशातील सुमारे १०.३३ कोटी कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्याचा उद्देश महिलांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.Gas Cylinder Subsidy

Gas Cylinder Subsidy काय आहे नवीन योजना?

  • अनुदान: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक गॅस सिलेंडरच्या खरेदीवर ₹३०० ची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
  • वार्षिक मर्यादा: एका वर्षात जास्तीत जास्त ९ सिलेंडरसाठी या अनुदानाचा लाभ घेता येईल.
  • उद्देश: या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि लाकडी चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या कमी करणे हा आहे.

मे २०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत १०.३३ कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत आपले जाळे विस्तारले आहे. या नवीन अनुदानामुळे गॅसचा वापर वाढेल, असे अपेक्षित आहे. हा निर्णय ‘लाडक्या बहिणीं’ना आर्थिक आधार देईल आणि त्यांचे जीवनमान अधिक सोपे करेल, अशी अपेक्षा आहे.Gas Cylinder Subsidy

Leave a Comment